कोरड्या हरभऱ्याला आग, ५५ हजारांचे नुकसान

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील तळवेल शिवारातील शेतात कोरड्या हरभऱ्याला आग लागल्याने ५५ हजार रुपये किमतीचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ३ वाजता घडली आहे. या संदर्भात दुपारी १ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र निवृत्ती सरोदे वय-४६, रा. तळवेल ता. भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तवला असून त्यांचे तळवेल शिवारातील शेत गट क्रमांक 435 मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी कापून ठेवलेला कोरडा हरभरा जमा करून ठेवला होता. दरम्यान कोणीतरी वाटसरूने रस्त्याने जाताना बिडी किंवा सिगरेट पिऊन पेटते सिगरेट हवे फेकल्याने या हरभऱ्याच्या ढिगाराला अचानक आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे ५५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात राजेंद्र सरोदे यांनी दुपारी १ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कंखरे हे करीत आहेत.

Protected Content