सावदा ता. रावेर प्रतिनिधी। शहरातील भोईवाडा येथील एका घरात शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले असून दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील भोई वाड्यात राहणारे किशोर राणे यांच्या घरात ही आग लागली आहे. आज बुधवारी १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता विद्यूत शॉर्टसर्किंटमुळे घरात आग लागली. या आगीत घरातील गोदरेज कपाटातील ५० हजाराची रोकड, वॉशिंग मशिन, ईलेक्टिक दुकानातील सामान, कपाटातील कपडे, फॅन आदी संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे. या आगीत दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा तलाठी शरद पाटील यांनी पंचनामा केला आहे. राणे हे कुटुंबीय जेमतेम परिस्थिती असून त्यांना शासनाने आर्थिक मदत करावी.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.