जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील गणपती नगरातील सुरेश ड्रायफ्रुट दुकानाला शार्टसर्कीटमुळे अचानक लागल्याची घटना घडली. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चार बंबांद्वारे ही आग विझविण्यात आली. यामध्ये फर्निचरसह एसी जळून खाक झाले असून याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, बुधवारी १७ मे रोजी मध्यरात्री सुरेश फुड वर्ल्ड दुकानामध्ये आग लागली. आगीत कार्यालयातील एसी तर दुकानातील फर्निचर, कुलर तसेच काही साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापलिका विभागाचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आग विझविण्यासाठी चार बंब लागले होते.
आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे विक्रांत घोडेस्वार, प्रकाश चव्हाण, प्रभाकर सोनवणे, फायरमन निलेश सुर्वे, विलास पाटील, संजय तायडे, मदन जराड, गंगाधर कोळी यांच्याकडून सकाळी ४ वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक प्रवीण भोसले, हर्षल पाटील, पोलीस शिपाई किशोर पाटील हे उपस्थित होते. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.