जळगाव प्रतिनिधी । जळगाव पोलीस अधिक्षक स्थानकाच्या मागील बाजूस आज आग लागली. यात परिसरातील झुडपे जळून खाक झाली.
पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या मागील बाजूस असणार्या जिमखान्याबाहेर आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास आग लागली. यामुळे काही काळ परिसरात गोंधळ उडाला. तातडीने अग्निशमन बंब दाखल झाल्याने आगीवर लागलीच नियंत्रण मिळविण्यात आले. यात जिमखान्याबाहेरील झुडपे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र आग लागलीच विझवण्यात आल्याने फार जास्त हानी झाली नाही.
पहा : आगीबाबतचा व्हिडीओ.