भिवंडीत सॅनिटरी नॅपकिनच्या कारखान्याला आग

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाण्याच्या भिवंडी येथील सॅनिटरी नॅपकिनच्या कारखान्याला मंगळवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. आगीची मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही, अशी माहिती एका नागरी अधिकाऱ्याने दिली.

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी राजू वरळीकर यांनी सांगितले की, सरवली औद्योगिक परिसरात असलेल्या कारखान्यात पहाटे तीनच्या सुमारास आग लागली.बीएनएमसीचे अग्निशमन दल तसेच ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सकाळी ८.३० वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. परंतु, कारखान्यात साठवलेला कच्चा माल जळून खाक झाला, असे सांगून कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नेमकी आग कशामुळे लागली, याचे कारण तपासले जात आहे.

Protected Content