दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील एम्स रूग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाचा पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, भाजपाचे नेते अरुण जेटली यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरु आहे.
एम्स रुग्णालयात अनेक बड्या नेत्यांवर उपचार केले जातात त्यासाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. सध्याच्या माहितीनुसार अरुण जेटली ज्या मजल्यावर आहेत तिथे ही आग पोहचली नाही. मात्र आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. एम्स रुग्णालयातील इमरजन्सी लॅबजवळ ही आग लागली आहे. आगीच्या घटनेमुळे ही लॅब बंद करण्यात आली आहे. तसेच रूग्णालायता कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.