जळगाव प्रतिनिधी । शहरातील विख्यात बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांना रात्री शहरातील गोरजाबाई जिमखान्याच्या परिसरात एका टोळक्याने मारहाण केली. त्यांच्या डोक्याला मार लागला असून नाका-तोंडातून रक्त येऊ लागल्याने त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर रात्री उशीरा साहित्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी महापौर ललीत कोल्हे आणि इतरांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.