भुसावळ प्रतिनिधी । येथील गौसिया नगरातल्या मशिदीत नियमांचे उल्लंघन करून सामूहिक नमाज पठण केल्यामुळे संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही धार्मिक कार्यक्रमात एकत्र येऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. तरीही शनिवारी सकाळी शहरातील गौसिया नगरमधील मशिदीत ५० पेक्षा जास्त लोक नमाजसाठी एकत्र आले होते. कोरोनामुळे शासनाने सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. जिल्हाधिकार्यांनी याबाबत आदेश दिले आहेत. तरीही बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील गौसिया नगरातील मशिदीत शनिवारी सकाळी गर्दी झाली होती. यामुळे संबंधितांवर बाजारपेठ पोलिस ठाण्यात नंदकिशोर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.