Home क्राईम अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल

0
25

बोदवड प्रतिनिधी । येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी दोघांविरूध्द पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बोदवड येथे दिनांक २ एप्रिल रोजी एका अल्पयीन मुलीला दोन जणांनी जामनेर रोडवर अडवून फोटो काढून तू माझ्यावर प्रेम कर नाही तर तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल अशी धमकी दिली होती. यानंतर २ मे रोजी तालुक्यातील साळशिंगी येथे सार्वजनिक जागेत सूर्या मेहतर (पूर्ण नाव माहीत नाही) व चेतन सुरेश गायकवाड या दोघांनी तिला अडवले. व सूर्या याने त्या तरूणीला प्रपोज केले तरी उत्तर दिले नाही म्हणून छळले. तर चेतन सुरेश गायकवाड याने मुलीला धमकावले. या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशन दोघांवर ३५४ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound