‘त्या’ पंचायत समिती सदस्याविरूध्द गुन्हा दाखल

शेअर करा !

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राडा केल्या प्रकरणी पंचायत समिती सदस्य ललीत वाघ यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पंचायत समिती सदस्य ललीत वाघ यांनी नांद्रा येथील वैद्यकीय केंद्रात राडा करून याचे फेसबुक लाईव्ह केले होते. या अनुषंगाने आज वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्‍वर रमेश सयासे यांनी फिर्याद दिली. यात सयासे यांना ललित राजेंद्र वाघ राहणार राणीचे (बांबरुड )रांनी काहीएक कारण नसताना दारूच्या नशेत शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला व कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले. तसेच याचे फेसबुक लाईव्ह करून बदनामी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या विरूध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कलम ३५३ ,३२४, ५०४, ५०६, ४२७ ,५०९, ५१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्रात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौबे हे करीत आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!