Home क्राईम सामूहिक बलात्कार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

सामूहिक बलात्कार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

0
17

भुसावळ प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बामणोद येथील २२ वर्षीय तरूणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील बामणोद येथील २२ वर्षीय तरूणीवर झालेल्या कथित बलात्कारप्रकरणी यावल पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. ८ ते १२ एप्रिल दरम्यान तरुणीवर यावल शहरातील ३ तर भुसावळातील २ अशा पाच नराधमांनी बलात्कार केला होता. हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडून यावल पोलिसांकडे वर्ग झाला आहे.

बामणोद येथील पीडित तरुणीचे ८ एप्रिल रोजी यावल बसस्थानकावरून तीन तरूणांनी दुचाकीवरून अपहरण केले होते. यानंतर बुरूज चौकाच्या पुढील एका इमारतीत व शहरातील विस्तारीत भागातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत ९ एप्रिलच्या मध्यरात्री नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पहाटे भुसावळला सोडून सोडले. भुसावळ येथील दोन तरूणांनी तिला ११ एप्रिलला रिक्षामध्ये मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर येथे नेवून तिच्यावर बलात्कार केला, अशी आपबीती पीडितेने पोलिसांसमोर कथन केली. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound