कोरोना बाबत अफवा पसरवणार्‍यांच्या विरूध्द गुन्हा

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथे आक्षेपार्ह वक्तव्य करून कोरोना विषाणूबाबत अफवा पसरवण्याच्या कारणावरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, साकळी येथे दिनांक १३ जुलै रोजी रात्री साडेतास वाजेच्या सुमारास गावातील अक्सानगर पारिसरात राहणारे नुर मोहम्मद शेख कमालउद्दीन (वय २१ वर्ष, धंदा मिस्तरी काम) या उद्देशुन भुषण मधुकर कोळी ( वय २० वर्ष) ; सागर अशोक पाटील (वय २० वर्ष); विशाल बोरसे (वय २२ वर्षर्) गोल्या भोई ( वय २२ वर्ष), अक्षय शिरसाळे आणि मनोहर उर्फ भैय्या परदेशी (लोधी ) सर्व राहणार साकळी यांनी तुमच्या समाजामुळे गावात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे असे बोलुन आरोप लावला. यामुळे त्यांच्या विरूद्ध यावल पोलीस स्टेशनला या सहा जणांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर व पोलीस कर्मचारी उल्हास नथ्थु राणे हे करीत आहे.

Protected Content