रावेर प्रतिनिधी । रावेर शासकीय धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. मक्याला एका क्विंटल मागे २५ रुपये जास्त घेऊन बिनधास्त वरकमाई केली जात असल्याची तक्रार रावेर तालुका कॉग्रेस कमेटीने तहसीलदार यांच्याकडे केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी आदिवासी जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी, नरेंद्र पाटील (चिनावल), रामदास लहासे, भरत कुवर, सेवादल शहरध्यक्ष प्रतिक खराले, महेश तायडे, संतोष पाटील, महेशचन्द्र लोखंडे, रमेश कदम, महेंद्र पाटील, गणेश बोरणारे, फिरोज तडवी, गफूर तडवी आदि कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/196951858804215