पिंपळकोठेतील वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील पिंपळकोठे  येथे ता.९ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसात येथील बापु डीगंबर शिरसाठ (वय ४४)हे पाऊस सुरु झाल्याने शेतातून सायकलीवर येत असताना अंगावर वीज पडल्याने जखमी झाले होते. त्यांचा  ता.२० रोजी सकाळी  मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

गुरुवार  दि. २२ रोजी शासनाने तात्काळ बापु शिरसाठ यांच्या पत्नी शोभाबाई बापु शिरसाठ यांना चार लाखाचा धनादेश  देण्यात आला. आ. अनिल पाटील, तहसीलदार अनिल गवांदे,  जिल्हा परिषद सदस्य रोहिदास पाटील यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला. यावेळी इंधवे येथील सरपंच जितेंद्र पाटील, पिंपळकोठे येथील महेंद्र पाटील, दत्तात्र्यय पाटील, राजेंद्र पाटील, सुभाष पाटील, शत्रुघ्न पाटील, महेंद्र पाटील, अक्षय पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदारांनी केले सांत्वन

बापु शिरसाठ यांच्या पत्नी, लहान दोन मुले यांची भेट घेत आ. अनिल पाटील यांनी सांत्वन करीत पूर्ण ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पारोळा तहसील अंतर्गत कर्मचारी यांना सूचना देऊन  शोभाबाई शिरसाठ यांना पुढील मदतीसाठी सहकार्य करण्याचेही यावेळी  सांगण्यात आले. बापु शिरसाठ यांच्या लहान दोन मुलांना पाहून प्रत्येकाला यावेळी गहिवरून आले.

 

Protected Content