चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील लांबेवडगाव येथील गौशाळेत चारशेहून अधिक गायी असून चाऱ्याची भिषण टंचाई जाणवत आहे. हिबाब लक्षात येताच वरखेडे बु. सामाजिक कार्यकर्ता नितिन भरतसिंग पाटील यांनी ५ हजारांची आर्थिक मदत करून माणूसकीचा संदेश दिला आहे.
तालुक्यातील लांबेवडगाव येथील रवींद्र महाराज यांनी विविध ठिकाणांहून कत्तलखान्यासाठी जात असलेल्या गायींची सुटका करून लांबेवडगाव येथे गौशाळेची स्थापना केली आहे. या गौशाळेत चारशेहून अधिक गायी असून चाऱ्याच्या टंचाईमुळे गायींची गैरसोय होत होती. मात्र हि गंभीर स्वरूपाची बाब वरखेडे बु. येथील सामाजिक कार्यकर्ता नितिन भरतसिंग पाटील यांनी रवींद्र महाराज यांना ५ हजारांची मदत करून गायीसाठी चारा उपलब्ध करून दिले आहेत. सामाजिक जाणिवेतून केलेल्या या मदतीमुळे नितिन भरतसिंग पाटील यांचा सर्व स्तरातून कौतुक होत आहेत. रवींद्र महाराज यांनी केलेल्या मदतीचे आभार मानत चाऱ्याची भिषण टंचाई जाणवत आहे. त्यामुळे दानशूरांनी पुढे येऊन चाऱ्यासाठी मदत करावी असे आवाहन रवींद्र महाराज यांनी केले आहे.