पातोंडा येथे पूरग्रस्तांना रयत सेनेकडून आर्थिक मदत

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडा येथे गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आदीवासी बांधवांच्या घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हि बाब लक्षात येताच रयत सेनेने आर्थिक मदत देऊन माणूसकीचा दर्शन घडविले आहे.

चाळीसगावात ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे अनेकांचे जनावरे व घरे वाहून गेली. तर अनेकांचे जगणे असाह्य झाले. दरम्यान तालुक्याला एकूण सहा वेळा पूरपरिस्थिती तडाखा बसल्याने काही भागात अजून याची झळ बसत आहे. तालुक्यातील पातोंडा येथे अतिवृष्टीमुळे आदीवासी बांधवांच्या घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना अध्याप घरात वास्तव्य करण्यास खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान हि गंभीर स्वरूपाची बाब लक्षात येताच रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी धाव घेऊन पाहणी केली. तर खूप कठीणने येथील आदिवासी बांधव दिवस पुढे ढकलत आहेत. हे हदयद्रावक चित्र बघून रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी माणूसकीचे दर्शन घडवत विनोद ठाकरे यांना एकूण सहा हजार रुपयांचे धनादेश मंगळवार रोजी सुपूर्द केले.

याबाबत त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष नितीन महाजन, शहर अध्यक्ष नाना कापसे, शिक्षक सेनेचे शहर अध्यक्ष सचिन नागमोती, एम. एम. पवार, दीपक देशमुख, सागर जाधव, सोमा महाजन, राहुल गायकवाड, प्रशांत अजबे, मनोज भोसले, सोनू देशमुख, मनोज पाटील यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content