अमळनेर : ईश्वर महाजन
तालुक्यातील कळमसरे येथील वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले कै. डॉ. वामन महाजन यांचे मुंबई येथे चित्रपटसृष्टीत आर्ट डायरेक्टर असलेले सुपुत्र रमाकांत आपल्या आईचा वाढदिवस एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आई श्रीमती मालतीबाई यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण होत असताना, आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून देशासाठी शत्रूशी दोन हात करणाऱ्या सैनिकांसाठी नुकताच पाच हजार रुपयांचा धनादेश येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
श्रीमती मालती महाजन यांनी नेहमीच आपल्या पतीच्या वैद्यकीय व्यवसायात हातभार लावला आहे. या दाम्पत्याला दोन मुले व दोन मुली अशी अपत्ये असून ती अत्यंत संस्कारी चांगल्या पदांवर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मोठा मुलगा रमाकांत चित्रपटसृष्टीत आर्ट डायरेक्टर म्हणून तर लहान संजय बेंगळुरू शहरात वास्तव्यास आहे. आईच्या अमृतमहोत्सवी वाढ दिवसानिमित्त सैनिक कल्याण निधीमध्ये पाच हजार रुपये दिल्याने आपणास मोठे समाधान लाभले असल्याची भावना रमाकांत महाजन यांनी यावेळी व्यक्त केली.