पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बालाजी भक्त घनश्याम ठाकरे हे तिरुपति बालाजी दर्शनासाठी सायकलवरून निघाले होते. दरम्यान घनश्याम ठाकरे यांनी चौदाशे किलोमीटरचे अंतर सायकलवरून १६ ते १७ दिवसात पूर्ण करून पारोळ्यात परतले आहेत. ढोल-ताशे आणि डीजेच्या दणदणाटात त्यांच्या या धाडसाचे स्वागत होत आहे.
आज सकाळी दहा वाजेला पारोळ्यात आगमन झाले व त्यांच्या वाजेत गाजत डीजेच्या तालावर मोठ्या संख्येने त्यांचे स्वागत केले. व बजरंग दल विश्व हिंदू परिषद बालाजी स्वयंसेवक व पारोळ्यातील नागरिक स्वागत केले करण्यात आले. पारोळा येथे धरणगाव चौफुली येथे श्री शिवाजी गणेश मित्र मंडळ आझाद चौक व परिसरातील नागरिकांनी त्यांच्या फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत केले श्री शिवाजी गणेश मित्र मंडळाचे उपाध्यक्ष योगेश चौधरी व सल्लागार समितीचे अध्यक्ष विकास चौधरी खजिनदार गिरीश अशोक चौधरी व प्रसाद छोटू चौधरी सागर चौधरी व कैलास चौधरी भैय्या चौधरी विकी चौधरी यांनी धरणगाव चौफुलीवर स्वागत केले व सत्कार केला.
कजगाव नाका येथे बालाजी स्वयंसेवक विश्व हिंदू परिषद बजरंग दल व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. मनात सदिच्छा असेल तर हरप्रकारे सेवा करता येते देशसेवा हे मनातून कर्तृत्वातून व शारीरिक कार्यातून व्यक्त करता येतेच परंतु आपल्या कार्याबरोबर धैर्य व शौर्यतून व्यक्त होणे हे विशेष आहे आपल्या देश हा एकसंघ आहे या संदेशा बरोबरच पर्यावरण व आरोग्य यासाठी व्यायाम किती आवश्यक आहे आणि तो सायकलच्या माध्यमातून करणे किती गरजेचे आहे हे प्रात्यक्षिकच दाखवून दिले पारोळा येथील एका तरुणाने आपल्या धाडसाचे व निष्ठेचे उदाहरणच समाजापुढे ठेवले आणि तो म्हणजे घनश्याम ठाकरे.
परिवारातच देशभक्तीचा वारसा असलेले आजोबा शिवदास ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक होते. शेवटपर्यंत त्यांची आरएसएस व भाजपावर नितांत निष्ठा होती. हेच बाळकडू घेत अवघ्या चोविसाव्या वर्षी धनश्याम याने हा धाडसी निर्णय घेतला एकट्याने पारोळा ते तिरुपती बालाजी हे चौदाशे किलोमीटरचे अंतर सायकल वरून १६ ते १७ दिवसात केले व रस्त्याने जेथे थांबू जिथे मुक्काम होईल तिथे राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा, एकात्मता व पर्यावरण संरक्षण याविषयी आवर्जून सांगावं माहिती द्यावी. असा उपक्रम या सायकल प्रवासात केले. त्याच्या या साहसी प्रवासास श्री बालाजी मंदिर पारोळा येथून बालाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात केली होती. त्याला आमदार चिमणराव पाटील यांनी या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच बालाजी मंदिर संस्थान चे विश्वस्त, बालाजी यात्रा स्वयंसेवक मंडळ व पारोळ्यातील तरुण मंडळ यांनी ढोल ताशे व डीजेच्या स्वागत केले. त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.