Home राजकीय अखेर राज ठाकरेंच्या मुंबईतील पहिल्या सभेला परवानगी

अखेर राज ठाकरेंच्या मुंबईतील पहिल्या सभेला परवानगी


मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईतील पहिल्या सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. त्यानुसार ही सभा आता 24 एप्रिलऐवजी 23 तारखेला मुंबईतील शिवडीतील काळाचौकी मैदानात होणार आहे. सुरुवातीला मनसेच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे राज ठाकरेंची सभा होणार की नाही?, असा संभ्रम निर्माण झाला होता.

 

निवडणूक सभांना परवानगी देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी योजनेअंतर्गत राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. यावेळी मनसे निवडणूक लढवत नसल्याचेही कारण देण्यात आले होते. त्यानंतर या सभेसाठी महानगरपालिकेकडून परवानगी घेण्यास सांगितले गेले. मात्र, तेथे परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला होता. दरम्यान, सभेला परवानगी मिळण्यात शिवसेनेने खोडा घातल्याचीही चर्चा होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound