नवी दिल्ली | रामायण यात्रेतील ट्रेनमध्ये वेटरसह अन्य कर्मचार्यांना दिलेल्या ड्रेस कोडवरून वाद झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने यात बदल केला आहे.
आयआरसीटीसीनं धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मदेखो देश अपनाफ या मोहिमेअंतर्गत रामायण यात्रा या नावाने डिलक्स एसी टूरिस्ट ट्रेन सुरू केली आहे. पण या ट्रेनमध्ये सेवा देणार्या कर्मचार्यांच्या ड्रेस कोडवरुन वादंग निर्माण झाले. या एक्स्प्रेसफमधील रेल्वेच्या कर्मचार्यांच्या ड्रेस कोडचा रंग भगवा ठेवण्यात आला होता. यावरुन उज्जैनच्या संतांनी सोमवारी याबाबत आक्षेप नोंदवला आणि रेल्वेनं जर कर्मचार्यांचा ड्रेस कोड बदलला नाही तर १२ डिसेंबर रोजी रामायण एक्स्प्रेस रेल्वेला दिल्ली रोखलं जाईल असा इशारा दिला होता. रेल्वेतील वेटर्सच्या ड्रेस कोडचा रंग भगवा ठेवणं हा तर हिंदूंचा अपमान असल्याचं संतांचं म्हणणं आहे.
साधू-संतांनी आक्षेप नोंदवल्यानंतर रेल्वेनं तातडीनं मरामायण एक्स्प्रेसफमधील कर्मचार्यांचा ड्रेस कोड बदलण्याचा निर्णय घेतला. रामायण एक्स्प्रेसमधील सर्व्हिस स्टाफचा ड्रेस कोड पूर्णपणे बदलण्यात आला आहे. आता सर्व्हिस स्टाफ प्रोफेशनल कपड्यांमध्ये दिसणार आहेत. झालेल्या असुविधेसाठी आम्ही खेद व्यक्त करतो, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे आता हा वाद निवळल्याचे दिसून येत आहे.