Home क्राईम जळगावात दोन तरुणींमध्ये फिल्मीस्टाईल हाणामारी

जळगावात दोन तरुणींमध्ये फिल्मीस्टाईल हाणामारी


जळगाव (प्रतिनिधी) येथील जी.एस.मैदानावर दोन तरुणींमध्ये कुठल्या तरी कारणावरून आज दुपारी फिल्मीस्टाईल राडा झाला. यातील एका तरुणीने आपल्या परिचयातील काही मुलांना बोलावून घेतले होते. त्यामुळे स्फुरण चढल्याने तीने दुसऱ्या मुलीची चांगलीच धुलाई करून घेतली. दरम्यान यावेळी उपस्थित काही जणांनी या हाणामारीचा बनवलेला व्हिडीओ थोड्याच वेळात सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

या संदर्भात अधिक असे की, जी.एस.मैदानाजवळील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन तरुणींमध्ये कुठल्या तरी विषयावरून वाद होता. आज दुपारी साधारण चार वाजेच्या सुमारास त्या दोघं तरुणींमध्ये महाविद्यालयात वाद झाला. थोड्याच या वादाचे पर्यावसान चांगल्याच शाब्दिक चकमकीत झाले. त्यानंतर यातील एका तरुणीने आपल्या परिचित काही तरुणांना फोन करून बोलावून घेतले. याच दरम्यान, त्या दोघं तरुणी जी.एस.मैदानावर पोहोचल्या. बोलावलेली मुलं आल्यावर त्या तरुणीला चांगलाच जोर सुटला आणि तीने दुसऱ्या तरुणीची धुलाई करायला सुरुवात केली. दरम्यान, यावेळी आलेली मुलं मात्र,सबंधित तरुणीला समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय. तर हाणामारी दरम्यान,अश्लील शिवीगाळ सुरु असल्याचे देखील स्पष्ट ऐकू येतेय. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी दोघं तरुणींना पोलीस स्थानकात नेले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound