बऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावरील खड्डे बुजविण्यास आज प्रारंभ

यावल –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   तालुक्यातील बऱ्हाणपुर अंकलेश्वर  या राज्य मार्गावरील खड्डे बुजविण्यासं आज प्रारंभ करण्यात आला.

 

 

यावल तालुक्याला दळण वळणाचे साधन म्हणुन दोन महत्वपुर्ण गुजरात आणि  मध्य प्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपुर अंकलेश्वर या राज्य मार्गावरील यावल ते चोपडा दरम्यान महामार्गाची दुरवस्था झाली आहे.  या खड्डेमय रस्त्यावर अपघातात अनेक निरपराध नागरिकांचे बळी गेले असुन काहींना गंभीर दुखापत होवुन अपंगत्व मिळाले आहे.  साकळी येथील जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती रविन्द्र पाटील यांनी यावल ते किनगाव पर्यंतचा रस्ता दुरूस्त व्हावा या मागणीसाठी आमरण उपोषण केले होते. उपोषणाच्या तब्बल १५ दिवसानंतर  रस्ता दुरूस्तीच्या कामास सुरुवात झाली आहे.  रस्ता दूरूस्ती ही यावल ते किनगाव पर्यंतची असून किनगाव ते चोपडा पर्यंतच्या मार्गाचे काय असा प्रश्न आता उपास्थित होत आहे.

 

Protected Content