पिक विम्याची रक्कम न देणाऱ्या बँक शाखेवर गुन्हे दाखल करा- जिल्हाधिकारी

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील शेतकऱ्‍यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम देण्यास विलंब करणाऱ्‍या चार बँक शाखांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्याने बँकींग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तिन वेळा मुदत देऊन सुध्दा शेतक-यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम देण्यास विलंब करणा-या रावेर तालुक्यातील चार बँक शाखांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्याने बँकींग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. यामध्ये १) सेंट्रल बँक ऑफ खानापुर (ता. रावेर) २) आयसीआयसीआय रावेर ३)भारतीय स्टेट बँक रावेर ४) भारतीय स्टेट बँक निंभोरा (ता रावेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशात नमूद केले आहे. या बाबची फिर्याद तक्रार निवार समितीने देण्याचे आदेशात म्हटले आहे. रावेर तालुक्यात तक्रार निवार समितीच्या अध्यक्षा तहसीलदार तर सचिव कृषी अधिकारी आहेत.

 

Protected Content