जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हिंदू देवी-देवता व राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य आणि टिंगल टवाळकी करून सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या सुषमा अंधारे यांचा तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन छावा मराठा युवा महासंघातर्फे बुधवार २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची १ नोव्हेंबर रोजी धरणगाव येथे सभा घेण्यात आली. या जाहीर सभेत भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी एकेरी शब्दात उल्लेख करीत राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य केले. तसेच इतरही अनेक भाषणांमधून हिंदू धर्माचे देवी देवता यांचे विषयी सुद्धा अत्यंत आक्षेपार्ह, टिंगल, टवाळकी करीत खालच्या स्तराचे वक्तव्य केलेले आहे. याव्यतिरिक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, अण्णा हजारे अशा व्यक्तींविषयी अवमानकारक वक्तव्य करून नकला व मिमिक्री करून अपमान केला आहे. सुषमा अंधारे यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असे बेताल वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन छावा मराठा युवा महासंघातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, कार्याध्यक्ष महेंद्र कोळी, महानगर उपाध्यक्ष राहुल लष्करे, दीपक जाधव, दिनेश भोळे, निलेश पाटील, भीमराव सोनवणे, आकाश घेंगट यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/789524822416164