नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करा – मराठे

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतांना  नियमांचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे

याबाबत वृत्त असे की पीक विम्याचे निकष आधी प्रमाणेच करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांनी फिजिकल डिस्टंसिंग सह अन्य नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आज भाजप पक्षाच्या वतीने माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्याचे दोन्ही खासदार आमदार यासह सर्व लोकप्रतिनिधींनी जिल्हा अधिकारी कार्यालय येथे राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

परंतु जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना मात्र जमाव बंदीचे, सोशल डिस्टंसिंग चे सर्व आदेश धाब्यावर बसवत जिल्हाधिकार्‍यांना तब्बल 40 लोकांनी जिल्हाधिकारी यांच्या केबिनमध्ये घुसून निवेदन दिले. 

एरवी जिल्हाधिकारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाच्या प्रतिनिधींचे निवेदन स्वीकारताना केवळ पाच लोकांनी निवेदन देण्याकरता केबिनमध्ये यावे या प्रकारचे नियम दाखवतात..परंतु भाजप पक्षाचे निवेदन स्वीकारताना मात्र जिल्हाधिकारी स्वतः नियम विसरलेत का..? भाजप पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आता जिल्हाधिकारी यांनी स्वतः त्यांच्यावर ती कारवाई करावी या प्रकारची मागणी एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे.

 

Protected Content