Home क्राईम शिवीगाळ केल्याचा जाब विचाल्याच्या कारणावरून हाणामारी; ५ जणांवर गुन्हा

शिवीगाळ केल्याचा जाब विचाल्याच्या कारणावरून हाणामारी; ५ जणांवर गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाल्मिक नगरातील कोळी पेठ येथे शिवीगाळ केल्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारीत तरूणावर तलवार हल्ला केल्याचा प्रकार शनिवार २७ नोव्हेंबर रेाजी उघडकीला आला आहे. याप्रकरणी परस्परविरोधात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रवि कमलाकर बाविस्कर (वय-३४) रा. वाल्मिक नगर, कोळी पेठ जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रवि बाविस्कर हा तरूण शनिवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील वाल्मिक नगरातून जात असतांना सुरेश पुंडलिक ठाकरे याने रविला थांबवून शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. या कारणावरून सुरेश ठाकरे, शंकर पुंडलिक ठाकरे, गणेश पुंडलिक ठाकरे,  रा. वाल्मिक नगर आणि हर्षल चंद्रकांत सोनवणे रा. मेस्कोमाता नगर जळगाव यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तर सुरेश ठाकरे आणि शंकर ठाकरे यांना हाता तलवारने रवि बाविस्कर याच्या डोक्याला आणि हातावर वार करून जखमी केले. याप्रकरणी रवि बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुरेश ठाकरे, शंकर ठाकरे, गणेश ठाकरे आणि हर्षल सोनवणे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि यशोदा कणसे करीत आहे.

 

दुसऱ्या फिर्यादीत शंकर पुंडलिक ठाकरे यांनी म्हटले आहे की, रवि कमलाकर बाविस्कर रा. वाल्मिक नगरात हा २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घरसमोर येवून शिविगाळ केल्याचा जाब विचारला. याचा राग आल्याने रवि बाविस्कर याने शंकर ठाकरे याला शिवीगाळ करून हातातील लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून डोक्याला गंभीर दुखापत केली तसेच चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रवि बाविस्कर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण वानखेडे करीत आहे.


Previous articleरिंगरोड येथून तरूणाची दुचाकी लांबविली
Next articleसंजय महाजन यांचे निधन
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound