जामनेर प्रतिनिधी । कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करण्यात येत आहे. मात्र, जामनेर लसीकरण केंद्रात तालुक्याबाहेरील नागरिकांनी देखील नाव नोंदणी केली आहे. याच गोष्टीचा विरोध करत कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे.
कोरोना लसीकरणासाठी सर्वत्र कोविन ऍप तसेच वेबसाईटवर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आरोग्य विभाग तसेच शासनाच्या वतीने जाहीर केले असल्यामुळे नागरिक ऑनलाइन नोंदणी करीत असून तालुक्या बाहेरील नागरिकांनी सुद्धा ऑनलाइन नोंदणी केली आहे.त्यानुसार जामनेर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिग्रहित केलेल्या न्यु इंग्लिश स्कुल केंद्रावर लस उपलब्ध असल्याने नागरिक लसीकरण केंद्रावर सकाळपासून लाईनीत उभे राहिले मात्र नंबर लसीकरणाचा नंबर आल्यावर त्यांना बाहेरील तालुक्यातील असल्याचे सांगून त्यांच्या लसीकरणास विरोध करत बाहेरील तालुक्यातील ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिक व कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता या प्रकारामुळे अनेक नोंदणी झालेल्या नागरीकांना लस न घेताच परतावे लागल्याने शासन व प्रशासनाच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत काल नेरी येथेही असाच गोंधळ निर्माण झाला होता तरी शासनाने ऑनलाईन नोंदणी करणे थांबवावे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही अशी मागणीही या वेळी नागरिकांनी केली .
जामनेर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्या कडे निवेदन देऊन तालुक्यातील नागरिकांनाच प्राधान्य देण्यात येऊन लसीकरण करण्याची मागणी केली तालुक्यासह इतर जिल्ह्यातील नागरीक जामनेर तालुक्यात येत आहेत . त्यामुळे कोरोना लसीकरण केंद्रावर स्थानिक नागरीकांना लस घेण्यासाठी अडचण येत आहे.
कोवीड नियंत्रणासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने जामनेर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना प्राधान्याने प्रतिबंधात्मक लस देऊन त्यांचे लसीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसीलदारांना दिले निवेद तालुक्यासह शहरातील स्थानिक रहिवाशांना प्राधान्याने कोवीड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदार अरुण शेवाळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे आज केली आहे.