तिसऱ्या मजल्यावरून पडलेल्या बांधकाम माहिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू; जबाबदार व्यक्तींना अटकेची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील ई सेक्टरमध्ये इमारतीच्या बांधकाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी जबाबदार असलेल्या बांधकाम मालक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान महिलेल्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संशयित आरोपींना अटक करावी अशी मागणी महिलेचे पती यांनी केली आहे. प्रमिलाबाई शंकर चव्हाण वय ५५ रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमिलाबाई शंकर चव्हाण वय ५५ रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. एमआयडीसीतील ई सेक्टरमधील बांधकाम सुरू असल्याने प्रमिलाबाई चव्हाण ह्या ठिकाणी काही दिवसांपासून काम करत होत्या. बुधवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बांधकामाच्या तिसऱ्या मजल्यावर प्रमिलाबाई ह्या साफसफाई करून वेस्ट मटेरियल खिडकीतून फेकत असतांना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्या गंभीर जखमी झाले होते. एलटीएन त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याचा पतीचा आरोप

प्रमिलाबाई ज्याठिकाणी काम सुरू होते. त्याठिकाण बांधकाम ठेकेदार शेख अल्ताफ शेख उस्मान रा. जळगाव यांच्यासोबत वाद झाला होता. याबाबत प्रमिलाबाई यांनी पती शंकर चव्हाण यांना सांगितले होते. प्रमिलाबाई ह्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता मृत्यूपुर्वी महिलेने आपले पती यांना मला कुणीतरी मागुन ढकलून दिले आहे असे सांगितले. दरम्यान, ठेकेदार आणि माझी पत्नी यांच्या वाद झाल्याच्या कारणावरून माझ्या पत्नीला कुणीतरी ढकलून दिले आहे. त्यामुळे पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या बांधकाम मालक धिरज युवराज महाजन आणि ठेकेदार शेख अल्ताफ शेख उस्मान यांना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी प्रमिलाबाई चव्हाण यांचे पती शंकर चव्हाण यांनी केले आहे.

न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही; नातेवाईकांचा पवित्रा
एमआयडीसी हद्दीत सुरू असलेले बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम कर्मचाऱ्यांना कुठल्याही पध्दतीचे सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली नाही. आज इमारतीच्या बाहेरच्या भागाला सुरक्षा जाळ्या लावल्या असत्या तर महिला कामगाराचा मृत्‍यू झाला नसता, दरम्यान ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या महिला कामगारावर उपचाराचा खर्च देखील संबंधित बांधकाम मालक व ठेकेदार यांनी दिलेला नाही. एलटीएन तसेच आर्थीक मदतही केलेली नाही उलट त्यांनी पोलीसात न जाण्यासाठी धमक्या दिला आहेत अशी माहिती मयत प्रमिलाबाई यांचे पती शंकर चव्हाण यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली आहे.

Protected Content