जळगाव प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या एमपीएससी स्पर्धा परिक्षेत यश संपादन करून आरटीओ निरिक्षकपदी नियुक्ती झालेल्या मयुरी मधुकर झांबरे यांचा आज पत्रकार तुषार वाघुळदे व बुलढाणा भ्रातृ मंडळाचे सचिव डी. के. देशमुख यांनी हृद्य सत्कार केला.
मूळचे यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील असणार्या आणि जळगावात स्थायिक असलेले महापालिकेत कार्यरत मधुकर लिलाधर झांबरे यांची सुकन्या मयुरी झांबरे हिची नुकतीच आरटीओ निरीक्षक या पदावर निवड झाली. त्याबद्दल लेवा गणबोली साहित्य मंडळाचे सचिव, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा कलावंत तुषार वाघुळदे आणि बुलडाणा भ्रातृ मंडळाचे सचिव व धडाडीचे कार्यकर्ते डी. के. दादा देशमुख यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन मयुरीचा सत्कार करून भावी तेजोमय वाटचालीसाठी मयुरी हिला शुभेच्छा दिल्यात.
मयुरी झांबरे हिने एमपीएससीचा अभ्यास करीत हे यश संपादन केले आहे. यावेळी मधुकर झांबरे , निखिल , मिलिंद , मयुरीची आई तसेच मयुरीशी श्री.वाघुळदे व श्री.देशमुख यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. मयुरी हिने शैक्षणिक वाटचालीत आलेले अनुभव कथन केले. ज्यांनी ज्यांनी प्रोत्साहन व अचूक मार्गदर्शन केले त्यांचा व गुरुजनांचा आवर्जून उल्लेखही केला.
जीवनात आपले ध्येय जर पक्के असेल आणि सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवला की, आपण यशाचे शिखर गाठू शकतो. अभ्यासाचा कधी मी बाऊ केला नाही. मनन, चिंतन करणे तसेच विरंगुळा म्हणून जुने- नवे गाणी ऐकली की मन प्रसन्न होत असते. ठरवलेला अभ्यास मी नियमितपणे करत असे. ज्यावेळी मन ध्येयाने प्रेरित होते , तेव्हा एकाग्रता वाढीस लागते व यश हे हमखास मिळते. मेहनतीशिवाय जीवनात आपण काहीच मिळवू शकत नाही असेही मयुरी झांबरे हिने सांगितले. प्रामाणिकपणे कर्तव्य करीत कुटुंबाचे व समाजाचे नाव उज्वल करेल असेही मयुरी झांबरे हिने आनंदाने सांगितले. सहा.आरटीओ निरीक्षक म्हणून लवकरच मयुरी झांबरे ह्या सेवेत येणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !
वेबसाईट: https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००
जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज
jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news