धानोरा ता.चोपडा (वार्ताहर) संपूर्ण देशात व राज्यात डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणामुळे जातीय विषमतेचे विकृत चित्र समाजासमोर नागडे झाले आहे. डॉ. पायल तडवी आत्महत्येमुळे राज्यभर आंदोलन सुरु असतांनाच धानोरा येथे देखील एका आदिवासी विद्यार्थिनीवर अन्याय झाल्याचे उघड झाले आहे. १२ वी च्या परीक्षेत महाविद्यालयात प्रथम येऊन देखील तिच्या ऐवजी इतर विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे.
नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. यात महाविद्यालयातुन प्रथम आलेल्या तरुणीला डावलून दुसऱ्यां आलेल्या मुलीचा महाविद्यालयात प्रथम आली म्हणून सत्कार केला. याची बातमी काही वर्तमानपत्रातून व व्हाट्सग्रुपवर प्रसिद्ध करण्यात आल्या. पण संबंधित विद्यार्थींनीने गुण तपासले असता तीला समजले की, आपण विद्यालयातून प्रथम आली आहोत. दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने केलेल्या अन्यायाबद्दल धानोरा येथील आदिवासी बांधव नाराज आहे. आपण गरीब असल्याने आवाज उठवू न शकल्याची खंत अश्वीनीने Live Trends News कडे व्यक्त केलीय.
दि २८ रोजी बारावीचा अॉनलाईन निकाल जाहीर झाला. यात येथील झि.तो. महाजन माध्यमिक व ना. भा. पाटील ज्युनिअर कॉलेजमधून अश्विनी अशोक पारधी ही विद्यार्थिनी प्रथम आली. अश्विनीला एकूण ४९६ गुण आहेत. पण प्रत्यक्षदर्शी येथील संस्थाचालक व शिक्षकांनी दि ३० रोजी सत्कार समारंभ आयोजित करत इतर विद्यार्थिनीला प्रथम आल्याचे घोषित करून टाकले. विशेष म्हणजे अश्विला पहिल्या तीनमध्ये देखील महाविद्यालय प्रशासनाने स्थाने दिले नाही. वास्तविक बघता अश्विनला सर्वात जास्त मार्क मिळालेले आहेत. दुसरीकडे याबाबतच्या बातम्या काही वर्तमानपत्रातून प्रसिध्द करत सोशल मिडीयावरही व्हायरल करण्यात आल्या. पण घटनेला दोन दिवसानंतर अश्विनीने निकाल तपासला असता, ती कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेली असल्याचे समजले. परंतू असा प्रकार निंदणीय असून एका आदिवासी मुलीला डावलल्याने संतप्त झालेले स्थानिक पदाधिकारी आंदोलन छेडणार आहेत. तर फक्त गरीब घरात वाढल्याने आपलीच काही चुक असेल या म्हणून अश्विनीने झालेला प्रकार कुणालाही सांगितला नाही.
दि ३० रोजी खुद्द भुसावळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी एस महाजन,चेअरमन सुकदेव पाटील,प्राचार्य के एन जमादार,माजी चेअरमन नामदेव पाटील,शालेय समितीचे सदस्य वामन महाजन,प्रदिप महाजन,माजी उपसभापती माणिकचंद महाजन,शिक्षक-शिक्षिका यांच्या उपस्थितीत सत्कार झाला. पण नेमका हा घोळ कुणामुळे झाला हे नेमके समजु शकले नाही. दरम्यान, सदर घोळ झाला असला तरी पहील्या आलेल्या मुलीचा सत्कार करुन योग्य मानसन्मान देणार असल्याचे संस्था अध्यक्ष बी एस महाजन यांनी सांगितलेले आहे.
माहीत होते,पण बोलु कुणाला
मी २८ रोजीच निकाल एका मोबाईलवर पाहीला.पण यात मला एवढे गुण मिळाले आणि मीच पहीली आली हे सांगु कुणाला? आम्ही गरीब आहोत. त्यामुळे गप्प राहिली अशी प्रतिक्रिया अश्वीनी पारधी या प्रथम आलेली विद्यार्थिनी दिली. तर शाळेतील शिक्षकांनी पडताळणी करुन नावे जाहीर करायला हवे होते.पण प्रत्यक्षदर्शी घाई करुन आदीवासी तरुणीवर अन्याय केला आहे.याबाबत आंदोलन छेडणार असल्याचे धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक भोई यांनी सांगितलेले आहे.
पालक समितीचे उपअध्याक्ष रविद्र माहाजन यानी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारण शाळेत कोणत्याही कार्यक्रमात पालक समितीला विश्वासात घेतले जात नाही. सदस्य निवड केलेली असून समितीच्या सदस्यांना बोलवले जात नाही,असा आरोप पालक समिती उपाध्यक्ष रविद्र माहाजन यांनी केला आहे.
वडील टॅक्सी चालक
अश्वीनी पारधी हीचे वडील अशोक रोजंदारी ने टॅक्सी चालवतात. आई पुष्पाबाई ह्या मोलमजुरी घरसंसार चालवतात. तरी अशा गरीबीच्या परीस्थितीतून अश्विनी ने शिक्षण घेतले आहे. तीला पाच बहीणी आहेत. दोन बहिणींचे लग्न झालेले आहे. अश्विनीला उच्च शिक्षण घेऊन पोलिस अधिकारी होण्याची इच्छा आहे.
अभ्यासिका मार्फत सत्कार
अश्वीनी पारधी हीचा विद्यालयात प्रथम क्रमांक येऊनही तीचे नाव जाहीर केले नाही. तसेच सत्कार केला नाही म्हणुन दि ३१ रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर मोफत अभ्यासिकामार्फत घरी जाऊन सर्व परीवारासह अश्विनीचा सत्कार करण्यात आला. यात तीला छोटे पुस्तक,पुष्पगुच्छ,पेढे भरवण्यात आले व पुढील शिक्षणासाठी पुस्तके पुरवण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. यावेळी संचालक प्रशांत सोनवणे,सुनिल कोळी,दिपक भोई,अभिषेक महाले आदी उपस्थित होते.