कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हंसराज पवार यांची दि.२८ जून रोजी पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली असून धुळे येथील पोलीस ट्रेनींग सेंटरला बदली झाल्याने येथील पोलीस स्टेशन व ग्रामस्थांतर्फे त्यांचा निरोप समारंभ पोलीस स्टेशनच्या आवारात नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पी.जी पिंगळे होते. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद पाटील, नुरुद्दिन मुल्लाजी, साप्ताहिक ‘विचार वैभव’चे संपादक राहुल मराठे, उपसंपादक सागर शेलार, पत्रकार दिपक शिंपी, संग्राम तांदळे, भास्कर चौधरी, रमेश जमादार, शाकीर पैलवान पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व पीएसआय नरेश ठाकरे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, हे.कॉ. दयाराम भिवसन पाटील, हे.कॉ. सहदेव दगडू घुले, हे.कॉ. शमिना पठाण, पोलीस नाईक शरद राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल जितेश पाटील, समाधान भागवत, दीपक आहिरे, हे.कॉ.ठाकूर व अन्य कर्मचारी आणि ग्रामस्थ आदींनी पवार यांचा श्रीफळ, रुमाल, टोपी, हार व गुच्छ देऊन सत्कार केला. तसेच साप्ताहिक विचार वैभवच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.
पो.नि.पवार यांनी मनोगतात स्टाफविषयी कृतज्ञता व्यक्त केली तर १० महिन्याच्या कालावधीत कासोदा वासियांसाठी मनात चांगली जागा निर्माण केली, अश भावना व्यक्त केल्या. त्यांनी दाखवलेल्या एकोप्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले, याशिवाय येथील ग्रीन आर्मी ग्रुप ला मदत म्हणून वृक्षारोपण करून त्यांना ‘ट्री गार्ड’ भेट दिले. तसेच येथील पो.हे.कॉ. सहदेव दगडू घुले यांची व दयाराम भिवसन पाटील यांची देखील सहाय्यक फौजदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही याच कार्यक्रमात पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.