
पाचोरा (प्रतिनिधी) येथील विघनहर्ता हॉस्पिटलचे संचालक तथा सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे डॉ.भूषण मगर यांची पाचोरा – भडगाव रोटरीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व माळी समाज पंच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना नुकत्याच शुभेच्छा दिल्या.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,कार्याध्यक्ष मुकेश तुपे, जिल्हा सल्लागार आबा सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष जीभाऊ पाटील, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष रवी देवरे,मराठा सेवा संघाचे विकास पाटील(नगरसेवक), शहराध्यक्ष एस.ए.पाटील,तुकाराम बीज उत्सव समितीचे सचिव संजय पाटील, प्रा.नितीन पाटील, संजय तावडे,माळी समाजाचे संतोष महाजन, ज्ञानेश्वर महाजन, व्यापारी संघाचे राजेश पटवारी सह सामाजिक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.