करमाड येथे डेंग्यू सदृश्य आजारामुळे ग्रामस्थांमध्ये भिती 

nilesh jamner

जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील करमाड येथील निलेश कैलास पाटील (वय १४) या बालकाला डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झाल्याने त्याला जळगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार करुन  त्याला घरी रवाना करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, निलेश हा गेल्या आठवड्यात आजारी असल्यामुळे त्यांच्यावर गावातच प्राथमिक उपचार करण्यात आले होते, मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले होते. तिथे रक्ताची चाचणी केल्यावर डेंग्यूची सुरूवात असल्याचे चाचणी अहवालात नमूद करण्यात आले. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनावर रोष व्यक्त होत आहे.

Protected Content