पश्चिम रेल्वेवर दहशतवादी हल्ल्याची भीती; हाय अलर्ट जारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) अहमदाबाद, रतलाम,मुंबई, राजकोटमध्ये पश्चिम रेल्वेवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट देण्यात आला असून गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर, सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 

whatsapp image 2019 03 01 at 2.12.11 pm 201903202180

चर्चगेटमधील महानिरीक्षक कार्यालयाने मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर येथील आरपीएफ प्रमुखांना पत्र पाठवले आहे. पत्रात सांगण्यात आले आहे की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची भीती आहे. गुजरातमधील गुप्तचर यंत्रणांनी सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले जातील अशी माहिती दिली आहे. यामध्ये रेल्वे स्थानकं, मंदिर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला टार्गेट केले जाऊ शकते. गुप्तचर यंत्रणांनी हा हल्ला हैद्राबादमधील व्यक्ती करणार असल्याचेही सांगितले आहे. हा दहशतवादी पुलवामा हल्ल्यातही सहभागी होता. कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी आरपीएफ जवानांनी राज्य पोलीस आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content