शाळेच्या खोलीत विना परवाना काढ्याच्या उत्पादनाचा गोरखधंदा ! ( व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । शहरातील एम. आय. तेली शाळेच्या खोलीत विना परवाना सुरू असणार्‍या युनानी काढ्याच्या युनिटवर आज अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून सामग्री जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरातील कॉलनीतील एमआय शाळेच्या खोलीत जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या पथकाने धाड टाकून धडक कारवाई करत १ लाख २ हजार रूपये मूल्य असणार्‍या काढ्याचे ३४ खोके आणि ८५००० हजार रुपये किमतीच्या दोन मशीन असा एकूण मुद्देमाल जप्त केल्याने भुसावळ शहरात मोठी खळबळ उडालेली आहे.

आठ दिवसांपूर्वी तक्रारदाराने या शाळेच्या आवारात अन्न व औषधी उत्पादनाचा परवाना नसताना कोरोना काढ्याची औषधी निर्मिती केली जात असल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आज जळगाव येथील पथकाने शाळेत सकाळी ११ वाजेच्या सुमारास धाड टाकून चौकशी करून मुद्देमाल व मशिनरी जमा केलेली आहे. ही कारवाई अन्न व औषध सौंदर्यप्रसाधने कायदा कलम १८ अंतर्गत करण्यात आलेली आहे. या शाळेचे मालक आसिफ इसाक तेली यांना नोटीस बजावण्यात आलेली असून सात दिवसाचे आत आवश्यक त्या कागदपत्रांसह खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.असा यावेळी पंचनामा करण्यात आलेला आहे.

ही कारवाई सहआयुक्त ए.एम. माणिकराव आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त जळगाव श्याम साळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली आहे. याप्रसंगी भुसावळ बाजारपेठचे कर्मचारी बडगुजर हे देखील उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणी आता पुढे काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खालील व्हिडीओत बघा याबाबतच्या कारवाईचा वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/315739172862975

Protected Content