Home क्राईम भरधाव दुचाकीच्या धडकेत बापलेक जखमी !

भरधाव दुचाकीच्या धडकेत बापलेक जखमी !

0
154

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव दुचाकीच्या धडकेत निळकंठ दिनकर कांबळे (वय ६१, रा. रथ चौक) यांच्यासह त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास कोर्टाच्या मागील बाजूस असलेल्या चौकात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रथ चौकात निलकंठ कांबळे हे वास्तव्यास असून ते मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मालवाहू रिक्षा गणेश कॉलनीतील अशोक बेकरी येथे लावून तेथून (एमएच १९, ईएल १०४१) क्रमांकाच्या दुचाकीने सहयोग क्रिटीकल हॉस्पीटलकडून जात होते. यावेळी डॉ. पी. एन. पाटील यांच्या दवाखान्याजवळील चौकत भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात निलकंठ कांबळे यांचा मुलगा अक्षय कांबळे हा जखमी झाला असून त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार घेतल्यानंतर कांबळे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound