सांगली जिल्ह्यात अग्रणीच्या पुरामध्ये पिता-पुत्री बुडाले

sangali pur

सांगली, वृत्तसंस्था | जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पावसामुळे अग्रणी नदीला मोठ्याप्रमाणात पूर आला आहे. या पाण्यात बाप-लेक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज (दि.६) पहाटे घडली. देशिंगहून कवठेमहांकाळकडे आरतीसाठी जात असताना मोरगाव येथील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने बाप-लेक वाहून गेले. योगेश पवार आणि त्याची सहा वर्षांची मुलगी श्रेया पवार अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

 

पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून योगेश पवार हे मुलगी श्रेया आणि त्यांचा पुतण्या असे तिघेजण देशिंगहुन कवठेमहांकाळ येथे आरतीसाठी येत होते. यावेळी मोरगावातील पुलावरून अग्रणीचे पाणी वाहत होते. पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह हे तिघेजण पाण्यात वाहून गेले. यापैकी पुतण्या पोहता येत असल्याने सुखरूप बाहेर आला. वाहून गेलेल्या बाप-लेकीचा शोध पोलीस आणि नागरिक घेत आहेत.

Protected Content