मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नवी मुंबई टाउनशिप येथे एक धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली आहे. वडिलांनी आणि भावानेच मुलीच्या प्रियकराची हत्या केली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 24 वर्षीय भावाला आणि वडिलांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तरुणीने तिच्या प्रियकराला पनवेल येथील देवाचा पाडा येथे घरी बोलवले होते. त्याचवेळी तरुणीचा भाऊदेखील घरी आला होता. सुरुवातीला त्याचे दरवाजा वाजवला मात्र तरुणीने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने जबरदस्ती दरवाजा उघडून आत गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की बहिण आणि तिचा प्रियकर आतमध्ये आहेत. तेव्हा आरोपीने त्यांच्या वडिलांना फोन केला.
बहिणीसोबत प्रियकराला पाहून तिच्या भावाचा राग अनावर झाला. त्यानंतर भाऊ आण वडिलांनी तिच्या प्रियकराला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, वडिल व भावाने केलेल्या जबर मारहाणीत 18 वर्षीय प्रियकराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेबाबत सूचना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. मुलीच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून भाऊ आणि वडील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले. दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर लगेचच तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. तळोजा पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.