भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील हॉटेल त्रिमुर्ती येथे जेवन आणि दारूचे बिल मागण्याच्या कारणावरून एकाने हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण करून धारदार वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना बुधवार २७ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवार २८ मार्च रोजी मध्यरात्री १२.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील हॉटेल त्रिमुर्ती येथे राजकुमार रविंद्र खरात रा. समता नगर, भुसावळ हा त्याच्या मित्रांसोबत जेवण व दारू पिण्यासाठी आले. जेवन झाल्यानंतर दारूचे पैसे न देता काऊंटरच्या वर असलेले मंदीर बाजूला फेकून दिले. यासाठी मॅनेजर धरमदास जिवनलाल चौधरी रा. साकरी फाटा वरणगाव रोड, भुसावळ यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि काहीतरी धारदार वस्तूने वार करून दुखापत केली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवन तक्रार दिली. त्यानुसार गुरूवार २८ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राजकुमार रविंद्र खरात रा. समता नगर, भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश पालवे हे करीत आहे.