
कोल्हापूर (वृत्तसंस्था) कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज- महागाव रस्त्यावर कार आणि एसटीच्या झालेल्या भीषण अपघात 5 जण जागीच ठार झाले आहेत. पाचही मयत एकाच गावातील असल्याचे कळते.
कोल्हापूरमध्ये आज दिवसभरातील हा दुसरा अपघात आहे. सकाळी कारच्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गडहिंग्लज तालुक्याला याच परिसरात सुमो कार आणि बसची धडकेत पाच जण ठार झाले आहेत. चंदगडहून नुलला येताना सुमो कारला अपघात झाला असून मयत पाचही जण कोल्हापूर जिल्ह्यातील नूल गावचे आहेत. भर रस्त्यात झालेल्या या अपघातामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.