महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अधिसंख्य पदावर वर्ग करण्यापुर्वी निवड श्रेणीस पात्र असलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेच्या वतीने गुरूवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद अंतर्गत शिक्षक सेवेत अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून कामाला आहेत. परंतू या शिक्षकांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यापुर्वी निवड श्रेतीस पात्र असतांना शिक्षकाना निवड श्रेणी लाभापासून वंचित ठेवले जात आहे. निवड श्रेणी ही जरी पदोन्नती प्रक्रियोचा भाग असला तरी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रक्रिया ही पदोन्नतीची कुंठीता घालविण्यासाठी निर्माण केलेली वेतन श्रेणी आहे. परंतू अनेक शिक्षक हे निवड श्रेणी लाभास पात्र असल्याने त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यापुर्वी निवड श्रेणीस पात्र असतांना जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने गुरूवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. याप्रसंगी जगन्नाथ कोळी, गंगाधर सपकाळे, युवराज बाविस्कर, गोपीचंद बाविस्कर, सुभाष सपकाळे, राजेंद्र शिरसाठ, संतोष तायडे, धर्मराज सोनवणे आदी उपस्थित होते.

Protected Content