चाळीसगाव-लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे गावातील व्यायाम शाळेजवळ पार्कींगला लावलेले ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी १३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी १५ जून रोजी दुपारी ३ वाजता मेहुणबारे पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहुणबारे पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुरूषोत्तम अमृत पाटील वय ३८ रा. मांदुर्णे ता. चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरूवार १३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता गावातील व्यायाम शाळेजवळ त्यांनी त्यांचे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीजे ०८७७) हे पार्कींगला लावलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी हे ट्रॅक्टर चोरूननेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पुरूषोत्तम पाटील यांनी ट्रॅक्टरचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्याच्याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी १५ जून रोजी दुपारी ३ वाजता मेहुणबारे पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मिलींद शिंदे हे करीत आहे.