ठाणे (वृत्तसंस्था) ऐन सणासुदीच्या दिवसात फुलांचा भाव पडल्याने शेतकऱ्यांनी फुलं अक्षरशः रस्त्यावरच फेकून दिली आहेत.
झाडांवरच ओली झालेली फुले बाजारात येईपर्यंत खराब होत आहेत. त्यामुळे या फुलांना पाच रुपये किलोच्यावर दर मिळत नसून यामुळे शेतकरी पुरते हवालदील झालेत. ही फुले नाशिकहून कल्याणला आणण्यासाठीच एका किलोमागे सात रुपयांचा खर्च असून त्याच्यावर आम्हाला दोन तीन रुपयेही मिळणार नसतील, तर आमच्या मुलांची दिवाळी कशी साजरी होणार, असा उद्विग्न सवाल हे शेतकरी विचारत आहेत. भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली फुले रस्त्यावर टाकून देत परतीची वाट धरली आहे. तर अनेक शेतकरी नाईलाजाने मिळेल त्या दराने फुलांची विक्री करत आहेत.