यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शेतकरी बांधवांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
बांधवांनी शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या पिक विमा योजनेच्या २०२१ते २०२२ या कालावधीमध्ये योजनेचा लाभ मिळवण्यासाठी भाग घेतला असून अशा असताना देखील एक वर्षाचा कालावधी झाले असतांना देखील शेतकर्यांना अद्याप पर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने या संदर्भात पिकविमा कंपनीशी चर्चा करून शेतकर्यांच्या तात्काळ न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी शहर भाजपाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या यावल शहर शाखेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्र शासनाच्या पिक विमा योजनेचा लाभ मिळावा याकरीता शेतकरी बांधवांनी २े२१ते २२मध्ये भाग घेतला असुन , परंतु पिकविमा मागील १०ते १२पासुन मंजुर झाला असुन देखील पिकविमा कंपनी ही शेतकर्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे.
शासनाच्या नियमानुसार शेतकर्यांना ऑक्टोबर २०२२मध्येच या योजनेचा लाभातुन पैसे मिळवण्यास पाहीजे होते. असे असतांना देखील पिक विमा कंपनीकडून संपुर्ण आवश्यक असलेली कागदपत्रांची पुर्तता करून देखील शेतकर्यांना वेगवेगळी कारणे सांगुन विम्याची रक्कम देण्यास विलंब लावत आहे. परिसरातील शेतकरी बांधवांच्या वतीने वारंवार पिक विमा कंपनीच्या लोकांना विचारणा केली असता आपणास लवकरात लवकर पैसे असे उत्तर पिक विमा कंपनी कडून दिले जातात. यंदा शेतकरी आर्थिक संकटात ओढला गेला असून , त्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळाल्यास शेतकरी बांधव हे उधारी व कर्जबाजारीतुन मुक्त होइल अशी अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली आहे.
याचमुळे तरी शासनाने शेतकर्यांच्या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष वेधून पिक विमा कंपनीशी चर्चा करून मार्ग काढावा अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉ निलेश गडे , कृष्णाजी देशमख, योगेश बारी , मनोज करणकर यांच्यासह शेतकरी व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.