नाशिक प्रतिनिधी । अखील भारतीय किसान सभेतर्फे विविध मागण्यांसाठी आज मुंबईकडे लाँच मार्च सुरू करण्यात आला असून यात आदिवासी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गतवर्षी नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देत मागण्या मान्य केल्या. त्यास वर्ष होत आले तरी अद्याप काही मागण्या बाकी असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मोर्चेकर्यांशी वाटाघाटी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. मात्र, या भेटीत तोडगा निघू शकला नसल्यामुळे आज सकाळी शेतकर्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला.