Home Agri Trends शेतकरी त्रस्त आणि कृषी मंत्री रमी खेळण्यात व्यस्त !

शेतकरी त्रस्त आणि कृषी मंत्री रमी खेळण्यात व्यस्त !


मुंबई-वृत्तसेवा | एकीकडे विविध समस्यांनी शेतकरी ग्रासला असतांना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतांना स्मार्टफोनवर चक्क रमी खेळत असल्याचे छायाचित्र समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली असून कोकाटे यांच्यावर टिकेची झोड उठविली जात आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मंचावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन रमी खेळत असतांनाचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळ अधिवेशनातील असल्याचे मानले जात आहे. एकीकडे सभागृहात जनहिताच्या मुद्यांवरून चर्चा होत असतांना राज्याचे गृहमंत्री माणिकराव कोकाटे हे चक्क मोबाईलवर रमी खेळत असल्याचे पाहून सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

माणिकराव कोकाटे हे आधीदेखील वादात सापडले होते. त्यांनी शेतकऱ्यांचा अवमान करणारी वक्तव्ये केल्यामुळे त्यांच्या विरोधात टिकेची झोड उठली होती. यावरून त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती. यानंतर आता ते थेट ऑनलाईन रमी खेळतांना आढळून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होतअसून यामुळे कोकाटे हे पुन्हा एकदा वादात सापडल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound