अहमदनगर (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांनो भाजपाचे नेते तुमच्या दारात मतं मागायला येतील. त्यांना तुमच्या दारातही उभं करु नका, असे म्हणत अहमदनगर येथील सभेत शरद पवार यांनी भाजपाच्या नेत्यांवर टीका केली आहे.
यावेळी पवार यांनी भाजप सरकारच्या शेतकरी व उद्योगविषयक धोरणांवर कडाडून हल्ला चढवला. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. ‘शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली, त्यावेळी कांदा निर्यातबंदीचा निर्णय सरकारने घेतला. आम्ही सत्तेत असताना आम्ही एकाच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत होतो, पण आताच्या सरकारने अनेक विमा कंपन्या काढून सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाहीय त्यामुळे सत्तेत आल्यानंतर अशा विमा कंपन्यांना धडा शिकवू, असे पवार म्हणाले. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी शरद पवार हे महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये प्रचार करत आहेत.