स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित : शिंदे

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे मतदारसंघातील शेतकरी ही दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित राहिली असल्याचा आरोप भाजप नेते अमोल शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

आज अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार किशोर पाटील यांच्यावर टिका केली. ते म्हणाले की, ाचोरा व भडगाव तालुक्यात गेल्या काळात देखील दुष्काळग्रस्त परिस्थिती होती. यावर्षीही मतदार संघात दुष्काळग्रस्त परिस्थिती असतांना देखील पाचोरा मतदार संघ दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित राहिला आहे. याउलट शेजारील चाळीसगाव तालुक्यातील माझे मित्र आ. मंगेश चव्हाण यांनी त्यांचा चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करुन घेत जवळपास १३३ कोटींचे पॅकेज चाळीसगाव तालुक्याला मंजुर करुन आणले. मात्र पाचोरा मतदार संघाचे स्थानिक प्रतिनिधी यांनी पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त न करुन घेता फक्त दुष्काळ सदृश्य घोषित करुन शेतकर्‍यांच्या तोंडाला फक्त आणि फक्त पाने पुसली आहेत. अशी घणाघाती टिका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील, प्रदिप पाटील, सोमनाथ पाटील, अरुण पवार, जगदिश पाटील, समाधान मुळे, योगेश ठाकुर उपस्थित होते. तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करून द्यावीत अशा आषयाच्या मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

Protected Content