धरणगाव (प्रतिनिधी) परतीच्या गेल्या पंधरवाड्यात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतू शेतकऱ्यांनी खचून न जाता मदत केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार तथा आमदार गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार धरणगाव येथे नुकतेच शिव मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी श्री. वाघ बोलत होते.
परतीच्या गेल्या पंधरवाड्यात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी. तसेच झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके आडवी झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढे हंगामामध्ये मिळणाऱ्या जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निकडीचा झालेला आहे. या ओला दुष्काळात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून शेतीमालासह फळबागांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या सर्व बाबींचा विचार करता सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व ओल्या दुष्काळामध्ये आपदग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी. याचसोबत शेतीनुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार तातडीची मदत मिळावी म्हणून शिवसेना मदत केंद्रांचे उदघाटन आज रोजी करण्यात आले.
पीक विमा, तलाठी, ग्रामसेवक, यांनी केलेल्या पंचनामा विषयी शेतकर्यांनी काढलेल्या पीक विमा बँकेतील खाते विषयी किंवा पंचनामे संदर्भात तक्रारी असल्यास शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ (९५११६५५४७७) तालुका प्रमुख गजानन पाटील (९९२१०४८२३१) शहर प्रमुख राजेंद्र महाजन (७५५९२०९६१०) यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फॉर्म भरण्यासाठी गुलाबराव वाघ यांच्याशी संपर्क साधून शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान गुलाबराव वाघ यांनी केले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उद्योगपती जीवनसिह बयस, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन ,प्रभारी नगराध्यक्ष अंजली विसावे , युवा सेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, दिपक सोनवणे, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, विलास महाजन, विजय महाजन, जितू धनगर, गजानन बयस, नाना ठाकरे, दिपक सोनवणे, नितीन पाटील, अनिल पाटील ,भदाणे गुरुजी, पोपट पाटील ,शिवा महाजन, हेमंत चौधरी, नारायण महाजन, बुट्या पाटील, कैलास पाटील, अफजल पठाण, नईम बागवान, महेंद्र चौधरी, नगराज पाटील, धिरेंद्र पुरभे , जयेश महाजन, विनोद रोकडे व सर्व परिसरातील शेतकरी शिवसैनिक उपस्थित होते.