यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथे नुकतेच यावल तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कौशल्य आधारीत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
चिंचोली येथील खंडेराव महाराज मंदिर सभागृह येथे आयोजित या प्रशिक्षणाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. लताताई सोनवणे ; शिवसेना जळगाव जिल्हा उपप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती तुषार (मुन्नाभाऊ) पाटील, जळगाव जैन इरिगेशनचे केळी संशोधन केंन्द्रातील केळी तंज्ञ शास्त्रज्ञ डॉ. के.बी.पाटील, पाल येथिल केळी शास्त्रज्ञ डॉ. धिरज नेहते, जळगाव येथिल जैन इरिगेशनचे डी.एम.ब-हाटे, यावल तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, यावल तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे, माजी जि.प सदस्य सुभाष सोंळुके, यावल प.स.चे माजी उपसभापती व प्रगतशील शेतकरी गोकुळ साठे, यावल तालुका उपप्रमुख योगेश पाटील, किनगाव मंडळधिकारी अजय खैरनार, कृषी सहाय्यक राजेन्द्र निकम ,समर्थ बायोटेक चे हिरामण राठोड आदि मान्यवर उपस्थित होते.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात जैन इरिगेशनचे केळी तंज्ञ डॉ. के.बी.पाटील यांनी केळी पीक लागवड तंत्रज्ञान , केळी उत्पादना करीता आवश्यक बाबी बाबत शेतकरी बांधवाना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी केळी उत्पादक शेतकरी यांची शेतकरी उत्पादक स्थापन करून प्रक्रिया उत्पादकास असलेला वाव याबाबत शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करून कृषी विभागाच्या योजनेचे निरसन केले.
सदरील प्रशिक्षणात केळी घड निसविण्याच्या वेळी थ्रिप च्या नियंत्रणाकरीता बड इंजेक्शन चा वापर करून नियंत्रण मिळविणे. त्याकरिता लागणा-या निविष्ठा इ.फ्लोरेट करण्याची आवश्यकता व योग्य वेळ; स्क्रटिंग बॅगचा वापर इ.बाबत शेतकरी बांधवाना परीपुर्ण माहिती देवुन प्रात्यक्षिक देखील करून दाखविण्यात आले . यावेळी कृषी विभागाच्या वतीने आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या तसेच केळी तज्ञ के बी पाटील , शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील ( मुन्नाभाऊ ) यांच्यासह आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना के बी पाटील यांनी केळी पिक विषयी मार्गदर्शन केले तर प्रत्यक्ष केळी उत्पादकांच्या शेती बांधावर जावुन केळी संबधीत मार्गदर्शन केले. यावेळी चिंचोली येथील प्रगतीशील शेतकरी दिवाकर बडगुजर, रविन्द्र देवरे, दिनेश सोंळुके, शिरसाडचे गोदु सोनवणे, नायगावचे सरपंच एल व्ही पाटील, गिरडगावचे मधुकर पाटील, वाघोदा येथील सुधाकर पाटील, राजेन्द्र पाटील , वाघझीरा येथिल पंचायत समितीचे माजी उपसभापती भारसिंग तेरसिंग बारेला आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .